ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या बोजवारा

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच्या बोजवारा

शहर : मुंबई

           मुंबई : मुंबईतील वस्त्यांमधील स्वच्छतेसाठी गेली सुमारे १० वर्षे महानगरपालिका दत्तक वस्ती योजना राबवित आहे. पण अधिकारी वर्गाचे लक्ष्यच नसल्याने या योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. स्थानिक लोकप्रतींनिधींच्या मर्जीतील संस्थांना या योजनेचे काम दिले जाते. ही संस्था एखाद्या ठेकेदाराला काम देते. ठेकदार १२ ते १४ कामगारांऐवजी दोन-तीन कामगारांकडूनच काम उरकून घेत असते. त्यामुळे वस्त्यांमध्ये स्वच्छते ऐवजी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीने नागरिक अस्वस्थ होतात. या कामासाठी महापालिका निधी पुरविते. मात्र प्रत्यक्षात निधीचा वापर कसा केला जातो, याबाबत शंका निर्माण होते.

         या संदर्भात अधिक माहिती अशी की, दत्तक वस्ती योजनेंतर्गत दर १० हजार लोकवस्ती मागे एका संस्थेला या योजनेचे काम दिले जाते. ती संस्था ठेकेदार नेमते. संस्था बदलली तरी ठेकेदार तेच असतात. किमान १४ कामगार अपेक्षित असतात. त्यातील काही कामगार गटार स्वच्छतेचे, काही वस्तीतील गल्लीबोळ सफाईचे तर काही ओला-सुका कचरा असे वर्गीकरण करून तो एका जागी गोळा करतात. तेथून महापालिकेची कचरा गाडी कचरा उचलून नेते. असा हा सारं प्रकार असतो. मात्र काही स्थानिक नगरसेवकांनी आपल्याच मर्जीतील संस्थांना कंत्राट दिल्याच्या तक्रारी वाढताच आता दर सहा महिन्यांनी संस्था बदलण्यात येतात. पण ठेकेदार मात्र वर्षानुवर्षे एकच असतो.

         सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात गेली काही वर्षे ही योजना सुरू असूनही येथे घाणीचे आणि दारुगंधीचे साम्राज्य पसरल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. वाकोला परिसरात एच पूर्व भागातील आग्रीपाडा येथे झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे. अशा वस्ती-वस्तीत जाऊन महापालिका दत्तक वस्ती योजनेंतर्गत त्या त्या परिसरातील स्वयंमसेवी संस्थेमार्फत स्वच्छता करते. आग्रीपाड्यातही या योजनेंतर्गत स्वच्छतेचे काम स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येते. या स्वयंसेवी संस्था ठेकेदारला काम देतात. मात्र कामगारांचे वेतन आणि स्वच्छतेसाठी लागणार्‍या सामुग्रीकरिता महापालिका ५० ते ६० हजार रुपये खर्चाकरिता देते. साफसफाई, गटारांची नियमित स्वच्छता, स्वच्छतेवर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे, रोगराई पसरू नये म्हणून रहिवाशांमध्ये प्रबोधन करणे आदी कामे या संस्थेने करावीत, अशी अपेक्षा असते. परंतु स्वच्छतेचेच काम नीट होत नाही. वस्तीतील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. त्यामुळे जागोजागी कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. कुणी तक्रार केली तर ठेकेदाराचे कामगार उडवाउडवीची उत्तरे देतात. स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था आणि पालिका अधिकारी यांच्या संगनमतामुळेच या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. अन्यथा साचलेला कचरा आणि निचरा न होणार्‍या सांडपाण्याच्या दुर्गंधीने रहिवासी त्रस्त झाले नसते. याची दाखल घेऊन महापालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मागे

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार

       सांगली : तक्रार निवारण दिवशीच १ फेब्रुवारीला व्हिडीओ कॉन्फरन्स....

अधिक वाचा

पुढे  

सांगलीत विहिरीमध्ये जीप कोसळली: ५ जणांचा मृत्यू
सांगलीत विहिरीमध्ये जीप कोसळली: ५ जणांचा मृत्यू

          सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील झरे गावाजवळ अ....

Read more