By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेले सातारचे सुपुत्र संदीप सावंत यांच्या पार्थिवावर आज मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद नाईक संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुण्याला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव साताऱयातील कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
तेथील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. तिथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांनी 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन 2011 ला ते भारतीय लष्करात दाखल झाले.
राजस्थानमध्ये देशाची सेवा केल्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आले. शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता, दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.
यात्रेकरूंना गंगासागर येथे घेऊन जाणारी खासगी बस उलटून एकाचा मृत....
अधिक वाचा