ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 08:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

शहर : मुंबई

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या (15 सप्टेंबर) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.

तसेच शाळा सुरु करण्याबाबत संस्था चालकांबरोबर चर्चा झाली. मात्र संस्था चालकांची अजूनही शाळा सुरु करण्याची मानसिकता नाही. शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील पालकमंत्री आणि पालकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ही चर्चा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करतील.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकार यासाठी जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. तर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

मागे

डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही?
डान्सबारच्यावेळी चार वेळा अध्यादेश काढले, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही?

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पा....

अधिक वाचा

पुढे  

तर...जनतेवर बेकारीची परिस्थिती येईल ! रेल्वेसेवेसाठी ठाकूरांचे सरकारकडे साकडं
तर...जनतेवर बेकारीची परिस्थिती येईल ! रेल्वेसेवेसाठी ठाकूरांचे सरकारकडे साकडं

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद अस....

Read more