ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दारू प्यायलात तर गाडी बंद

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दारू प्यायलात  तर गाडी बंद

शहर : delhi

रस्त्यांवरील अपघातात वाहन चालकाने मद्यप्राशन केल्याने होणार्‍या अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अशा अपघाताना आळा घालण्यासाठी दारू पिऊन वाहन चालवत असल्यास इंजिन सुरूच होणार नाही. अश्या प्रकारच भन्नाट तंत्रज्ञान वाहनात बसविण्याचा विचार असल्याची माहिती केंद्रीय रास्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी राज्यसभेत बोलताना दिली.

 

याबाबत अधिक माहिती देताना नितिन गडकरी यांनी पुढे सागितले की, वाहन चालकाने सीट बेल्ट न लावण्यास पोलिस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशीही वव्यवस्था करण्यात येणार आहे. यमुना एक्सप्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

दरम्यान वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय योजनाचा विचार करीत असल्याचेही गडकरी म्हणाले. टायर मध्ये रबर सोबतच सिलिकॉन आणि नायट्रोजन वायुचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये हा वापर केला जातो. या दोहिंमुळे टायर थंड होतो. त्यामुळे कितीही अंतर प्रवास केला तरी टायर फुटण्याची शक्यता कमी असते, असेही गडकरीनी सागितले.

मागे

ट्रकच्या धडकेनंतर बस पेटली : 7 जण गंभीर जखमी
ट्रकच्या धडकेनंतर बस पेटली : 7 जण गंभीर जखमी

नगर-औरंगाबाद  महामार्गावर शासकिय विश्राम गृहासमोर आज पहाटे ट्रक आणि एसटी ....

अधिक वाचा

पुढे  

मालशेज घाटात 31 जुलै पर्यंत पर्यटनाला बंदी
मालशेज घाटात 31 जुलै पर्यंत पर्यटनाला बंदी

मालशेज घाटात दरडी कोसळणे आणि दुर्घटना घडण्याचे प्रकार लक्षात घेऊन ठाण्याच....

Read more