ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुख्यात गुंड एजाज लकडावालाला अटक

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुख्यात गुंड एजाज लकडावालाला अटक

शहर : मुंबई

       मुंबई - गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून अटक करण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. एजाज लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे, तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.


      लकडावाला याची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ३० डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. सानियाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजाज याच्या मुसक्या आवळल्या. 


    त्याची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली. खार येथील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एजाज विरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरु होता. याप्रकरणात एजाज याचा भाऊ अकील लकडावाला यालाही अटक करण्यात आली होती.

मागे

कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  
कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  

         राज्यातल्या कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांवर उपासमारी....

अधिक वाचा

पुढे  

'खेलो इंडिया'च्या शुभारंभाच्या सोहळ्याला नरेंद्र मोदींची अनुउपस्थिती
'खेलो इंडिया'च्या शुभारंभाच्या सोहळ्याला नरेंद्र मोदींची अनुउपस्थिती

        गुवाहाटी - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात ईश....

Read more