ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2020 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड

शहर : देश

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळतोय. कोरोना काळात राज्यातील हजारो नागरिकांना शिवभोजन थाळीचा फायदा मिळालाय. १० रुपयांमध्ये मध्यान्ह थाळीची संकल्पना असून कोरोना काळात ५ रुपयांना थाळी देण्यात येतेय. दरम्यान शिवसेनेचे शिवभोजन थाळीच्या संकल्पनेला भाजपकडून जोरदार टक्कर मिळालीय. माजी क्रिकेटपट्टू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरच्या फाऊंडेशनतर्फे अवघ्या १ रुपयात थाळीची योजना प्रत्यक्षात उतरलीय. पाहता पाहता या थाळीसाठी दिल्लीत एकच झुंबड उडाल्याचे दिसतंय.

गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे १ रुपयात मध्यान्ह थाळीची संकल्पना राबवण्यात येत असून आज याचा तिसरा दिवस आहे. मध्यान्ह थाळीसाठी लोक रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची वाट पाहतायत. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या वतीने आधी दुपारी १२ ते २ पर्यंत कुपन वाटले जातात. पण ५०-५० जणांना भोजन मिळत. जन रसोईमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रोटोकॉलवर पूर्ण लक्ष दिलं जातंय.

विना मास्क कोणालाही जन रसोईत घेतलं जात नाही. स्वयंसेवक देखील या गोष्टीवर लक्ष ठेवतात. लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते अशी माहिती गौतम गंभीर फाऊंडेशनच्या सीईओ अपराजिता यांनी सांगितले.

मागे

‘लव्ह जिहाद’नामंजूर,… तर 10 वर्षांची शिक्षा; मध्य प्रदेशात ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक’ मंजूर
‘लव्ह जिहाद’नामंजूर,… तर 10 वर्षांची शिक्षा; मध्य प्रदेशात ‘धार्मिक स्वातंत्र्य विधेयक’ मंजूर

राज्यातील लव्ह जिदाची प्रकरणं रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने ‘धार्मिक ....

अधिक वाचा

पुढे  

स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती
स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती

स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त आढळला आहे. या घटनेमुळे नाशि....

Read more