ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

शहर : पुणे

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी', किंवा 'जा व्येथे  आज गोंजारणे सोडले'  या सारख्या भावस्पर्शी गझला लिहिणारे प्रसिद्ध कवी,गीतकार व गझलकार अनिल कांबळे यांचे पुण्यात निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्च्यात  पत्नी आरती व मुली प्रतिभा प्रेरणा असा परिवार आहे. 

अनिल कांबळे यांचा जन्म 11 ओक्तोंबर 1953 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मराठा विद्यालयात झाले. आबासाहेब गरवारे मध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. 1972 पासून त्यांनी काव्यलेखन करायला सुरवात केली.ते पीडब्लुडीमध्ये ते नोकरीस होते. तेथून ते निवृत झाले.  त्यांची 600 हून अधिक गाणी स्वरबद्ध झाली आहेत.

'माझ्या कविता' व 'त्या कोवळ्या फुलांचा' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. .  'परंतु' हा त्यांचा आगामी कवितासंग्रह .ते चित्रकार होते.  अनुप जलोटा, शंकर  महादेवन, स्वप्नील बांदोडकर, सलिल कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी त्यांची गाणी गायली आहेत. तर आनंद मोडक, श्रीधर फडके व यशवंत देव यांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केली आहेत. 

मागे

रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार
रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार

एनडिटीव्हीचे मॅनिजिंग एडिटर रविश कुमार यांना यंदाचा रमन मॅगसेसे पुरस्कार ....

अधिक वाचा

पुढे  

कुलभूषणला मदत देण्यासाठी पाकच्या दोन अटी
कुलभूषणला मदत देण्यासाठी पाकच्या दोन अटी

हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडावर स्थ....

Read more