By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 08:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशाचा विकासदर दिवसेंदिवस घसरत चाललेला दिसतोय. सप्टेंबर महिन्यात देशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर घसरलाय. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वात खालचा स्तर आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर ४.५ टक्के राहिल्याचं उघड झालंय. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्क्यांवर होता तर एका वर्षापूर्वी हाच आर्थिक विकास दर ७ टक्क्यांवर होता. सरकारी आकड्यानुसार, कोअर सेक्टरचं उत्पादन ऑक्टोबर महिन्यात ५.८ टक्क्यांनी घसरलंय. सरकारनं शुक्रवारी सायंकाळी आर्थिक विकासाचे (?) आकडे जाहीर केलेत. कृषी विकास दर, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घसरण पाहायला मिळालीय.
दुसऱ्या तिमाहीत मायनिंग ग्रोथ ०.१ टक्के, कन्स्ट्रक्शन ग्रोथ ८.५ टक्क्यांनी घसरून ३.३ टक्के, मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ ६.९ टक्क्यांनी घसरून १ टक्के, सर्व्हिस सेक्टर ग्रोथ ७.३ टक्क्यांनी घसरून ६.८ टक्के, इंडस्ट्री ग्रोथ ६.७ टक्क्यांनी घसरून ०.५ टक्क्यांवर पोहचलीय.
बेरोजगारीचे आकडे
AIMO नुसार, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये २०१४ पासून आत्तापर्यंत जवळपास ३५ लाखहून अधिक नोकऱ्यांमध्ये घट झाली
आयटी सेक्टरमध्येही जवळपास ४० लाख नोकऱ्यांवर संकट घोंघावतंय.
सरकारी कंपनी VSNL नं VRS द्वारे जवळपास ७५,००० जणांना नारळ दिलाय
गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगारी दर ४-१० टक्के राहिलाय
२०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्के राहिला
मोदी सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री संदर्भात मोठा निर्ण....
अधिक वाचा