By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोदी सरकारने विमा योजना सुरु केली होती. विमा हा महाग समजून गरीब त्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा इतके पैसे गोळा करु शकत नाहीत. या बाबी लक्षात घेता प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) सुरु केली आहे. यामध्ये 1 रुपया महिना देऊन 2 लाखाचा मृत्यू विमा मिळतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दरमहा 1 रुपया खर्च करावा लागणार आहे. म्हणजे वर्षाचे 12 रुपये खर्च करुन तुम्हाला 2 लाखाचा विमा मिळणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजने (PMSBY) चा फॉर्म ऑनलाईन किंवा बॅंकेत जाऊन भरता येऊ शकतो. कोणत्याही बॅंकेतून हा विमा फॉर्म तुम्ही भरू शकता. सार्वजनिक तसेच खासगी बॅंकांनी आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे स्वत:चे बॅंक अकाऊंट असणे गरजेचे आहे. विम्याची रक्कम थेट बॅंक अकाऊंटमधून डेबिट होणार आहे. यासोबतच www.jansuraksha.gov.in येथून फॉर्म डाऊनलोड करुन रक्कम बॅंकेत जमा करु शकता.
18 ते 70 वर्षापर्यंत वीमा
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंक अकाऊंट असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर 70 वर्षे वयापर्यंत तुम्हाला केवळ 624 रुपयेच द्यावे लागणार आहे. तसेच तुम्हाला 2 लाखाचा फायदा मिळणार आहे.
रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) चा वेळ वाढवून....
अधिक वाचा