ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन पत्नींसह पतीची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन पत्नींसह पतीची आत्महत्या

शहर : देश

गाझियाबादमध्ये एका आत्महत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. आठव्या मजल्यावरून एका व्यक्तिने आपल्या दोन पत्नींसह उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी त्याने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला. घरगुती कारणांमुळे या हत्या आणि आत्महत्या केल्याचा संशय आहे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला दोन पत्नी होत्या. त्या दोघींसह त्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. मृताचं नाव गुलशन वासुदेव असं आहे. उडी मारल्यानंतर पती आणि एका पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर, एका पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

परवीन आणि गुलशन अशी मृतांची नावं आहेत. तर, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेचं नाव संजना असल्याचं कळत आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संजना यांनाही काही वेळाने मृत घोषित करण्यात आलं. तर घरात सापडलेल्या मुलांची नावं रितिक आणि रितिका असल्याची माहिती मिळत आहेय. गुलशन यांच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे सध्या तपास करत असून काही महत्त्वाची माहिती हाती लागण्याच्या प्रयत्नांत आहेत.

मृतांच्या घरी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबावरील आर्थिक संकट अधोरेखित होत आहे. दिल्लीतील गांधीनगर येथे त्यांचा जीन्सचा कारखाना होता असं सांगण्यात येतं. या व्यवसायात त्यांचं बरंच आर्थिक नुकसान झालं होतं. नातेवाईकांनीच त्यांची कोटी रुपयांची रक्कम बळकावल्याही प्राथमिक माहितीही समोर आल्यामुळे आता सर्व दृष्टीकोनांतून या हत्या/ आत्महत्येचा तपास केला जात आहे. पहिल्यांदा दोन्ही मुलांची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.

मागे

दापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल
दापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल

दापोडीमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले, खडसेंचा गंभीर आरोप
रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले, खडसेंचा गंभीर आरोप

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने अ....

Read more