ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचा फतवा,मुलींने तोकडे कपडे घालू नये

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 24, 2019 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जे जे वैद्यकीय महाविद्यालयाचा फतवा,मुलींने तोकडे कपडे घालू नये

शहर : मुंबई

जिकडे - तिकडे मुलींच्या तोकड्या कपड्यावरून वाद निर्माण होताना आपण सर्वत्र पाहतो. पण आता चक्क मुंबईमध्ये सुद्धा मुलींच्या तोकडे कपडे घालण्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील जे जे वैद्यकीय महाविद्यालयाकडून मुलींसाठी अजब फतवा काढण्यात आला आहे. मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, कॅम्पसमध्ये मुला मुलींनी एकत्र फिरु नये असा नवा नियम महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडून काढण्यात आल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली आहे. महाविद्यालयात 'अस्तित्व' हा मोहत्सव सुरु होता, त्या दरम्यान मुलींवर अशा पद्धतीची बंधंने लादण्यात आल्याने, विद्यार्थिनींकडून संताप व्यक्त होत आहे. 

त्याचप्रमाणे मुलींच्या बाहेर फिरण्याच्या वेळेत सुद्ध महाविद्यालयाने अटी लादल्या आहेत. वसतीगृहात मुलींनी रात्री दहापर्यंत पोहचण्याच्या नविन नियमालाही विरोध केला जातोय. मुलांना अशा पद्धतीचे नियम लागू नाहीत, मग केवळ मुलींसाठी हे नियम का असा प्रश्न विद्यार्थिनींकडून विचारला जातोय. 

होळीच्या दिवशी जे जे वैद्यकीय महाविद्यालयात मुला मुलींनी बेताल वर्तन केलं. त्यावर कारवाई म्हणून हे नियम घालून देण्यात आल्याचं, जे जे चे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांनी सांगितलंय. तसंच एका कार्यक्रमापुरताच हा नियम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

पुढे  

ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी
ठाणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

ठाणे : ठाणे शहरासाठी अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरक....

Read more