By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 02:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातुन समोर आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळले आहेत. यामध्ये साजिद खान या तरुणाच्या गळ्याला जखम झाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बर्गर खात असताना साजिद खान यांच्या घशाला त्रास झाला. काही वेळाने त्यांच्या घशातून रक्त यायले लागले. त्यांच्या मित्रांना बर्गरविषयी शंका आल्याने त्यांनी बर्गर तपासले असता त्यांना त्यात काचेचा तुकडा आढळला.
त्यानंतर जास्तच अस्वस्थ वाटू लागल्याने साजिद खान यांना खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. साजिद खान यांची प्रकृती आता बरी आहे. पोलिसांनीही बर्गर किंग या हॉटेलच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी बर्गर किंग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या....
अधिक वाचा