By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 04:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी सैन्य पंधराव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ग्लोबल फायर पॉवर्स 2019 यांनी केलेल्या सर्वेतून समोर आली आहे. यामध्ये जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्यात पहिला क्रमांक अमेरिकेच्या सैन्याचा, दुसरा क्रमांक रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि चौथा क्रमांक भारतीय सैन्याचा आहे.
ग्लोबल फायरपॉवरमध्ये या सूचीत 137 देशांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व देशाच्या सैन्याची रॅकिंग हत्यारे आणि सैनिकांच्या संख्या बळावर केली नसून प्रत्येक सैन्य दलात किती प्रकारची हत्यारे आहेत, सैन्याची एकूण श्रम शक्ती किती आहे, देशाची लोकसंख्या, भूगोल आणि विकासावर अभ्यासकरुन सैन्याला रॅकिंग देण्यात आली आहे.
रॅकिंगमध्ये आण्विक शस्त्रे असणाऱ्या देशाला बोनस गुण देण्यात आले आहेत. पण शेवटच्या रॅकिंगमध्ये या गुणांचा समावेश केला गेला नाही. विभिन्न अभ्यासानुसार सर्वाधिक 25 ताकदवान सैन्यांना या यादीत जागा देण्यात आली आहे.
जगातील पंधरा ताकदवान सैन्यांच्या यादीत अमेरिका, रशिया, चीन, भारत, फ्रांस, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंग्डम, तुर्की, जर्मनी, इटली, मिस्त्र, ब्राझील, इरान आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे
आजपासून घटस्थापना, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस घर....
अधिक वाचा