By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गणेशोत्सवानिमित आपल्यालाही श्री गणेशाचे दर्शन व्हावे, त्याची पूजा-अर्चा करता यावी, या उद्देशाने मनमाडच्या सर्वधर्मीय चाकरमान्यांनी मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस या गोदावरी एक्सप्रेस मध्येच बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच आपला दररोजचा प्रवास सुखाचा व्हावा, अशी मनोभावे प्रार्थनाही चाकरमान्यांनी केली.
मनमाडमधून नाशिक मुंबईत कामासाठी मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. त्यासाठी गोदावरी एक्सप्रेसने प्रवास करणार्यांची संख्या अधिक आहे.गणेशोत्सव काळात सर्व चाकरमानी घराबाहेर असतात. आपल्यालाही गणेशोत्सव साजरा करता यावा, या हेतूने मनमाड नाशिक प्रवास करणाया वर्गाने गोदावरी एक्सप्रेसच्या पास धारक बोगीत विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली. या बोगीत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आता 10 दिवस सकाळी मनमाडला आणि संध्याकाळी परतीच्या प्रवासात नाशिक येथे आरती केली जाणार आहे. यावर्षी स्वच्छता अभियानावर भर देत स्वच्छतेवर जनजागृती करणारे पोस्टर गाडीत लावण्यात आले आहेत. एरव्ही 500 किमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी आपआपल्या कामात व्यस्त असतात. मात्र गणेशोत्सवाचे 10 दिवस सर्वधर्मीय नोकरदार, प्रवासी एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडवित असतात.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्वाकांक्षी मोहीम असलेले चंद्रयान 2 अगदी ज....
अधिक वाचा