ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, चांदी ही महागली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2019 03:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, चांदी ही महागली

शहर : मुंबई

सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ३७ हजाराचा आकडा पार केला आहे. अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोनं महाग झाल्याचं बोललं जातं आहे. गुंतवणूकदारांचा सोन्यामधला रस वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.

सोमवारी सोन्याच्या भावात 800 रुपयांची वाढ झाली होती. सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. सोनं 37 हजारापासून फक्त 30 रुपये कमी आहे.

ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी म्हटलं की, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचला आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीही हजार रुपयांनी वाढून 43,100 रुपये प्रति किलो झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे देखील सोनं महागलं आहे

दिल्लीमध्ये 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून अनुक्रमे 36,970 आणि 36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

 

मागे

अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता
अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा राखणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ अ काढण्याचा ऐतिहास....

अधिक वाचा

पुढे  

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन ....

Read more