By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गणेशोत्सवाकाळात प्रती तोळा 40 हजार च्या घरात पोहोचलेले सोन्याचे दर आज सल्लग दुसर्या दिवशीही कमी झाले आहे. या पाठोपाठ चांदीचीही घसरण होताना दिसत आहे. बुधवारी सोने 1730 रुपयांनी घसरला तो आज पुन्हा घसरल्याने 2000 ने कमी झाला आहे. बुधवार पासून 3730 रुपयानी दरात कमी झाली आहे. त्यामुळे आज सोने 37877 रुपये प्रती तोळा आहे. गेल्या हफ्त्यात सोने 39278 रुपये होते.
चांदीचेही दर प्रती किलो 47518 रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो 51489 रूपये होती. उत्सावाच्या काळामध्ये सोन्या चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असते. रुपयाला मिळालेलं बळ आणि मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 24 टक्क्यांनी तर चांदीच्या दरात 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु सध्यातरी सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढेल अशी आशा या क्षेत्रातले उद्योजक करत आहेत.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांची नियुक्ती कर....
अधिक वाचा