By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैशीच्या दूध दरात वाढ केली असल्याने शेतकर्यांससाठी खुशखबर आली आहे. म्हैशीच्या दुधाच्या खरेदीत १.७० रुपये वाढ करण्यात आली आहे. तसेच हे दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहेत.
जिल्हा सहकारी दूध उत्पाादक संघ (गोकूळ) संघाने या दरवाढीचे परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आले आहे. गायी दूध दरामध्ये ३.५ फॅट आणि ८.५ एस.एन.एफ करिता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे गाय दूध दर २७ रूपये वरून आता २९ रूपये इतका होणार आहे. तसेच म्हैणशीच्या दूध खरेदी दरामध्येर ७.० फॅट आणि ९.० एस.एन.एफ करिता एक रूपये सत्तेर पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्हैास दूध खरेदी दर ४२. ३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे.
नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींन....
अधिक वाचा