By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 10:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांना लहान मुलांप्रति अतिशय प्रेम होतं आणि मुलंही त्यांना प्रेमाने चाचा नेहरु बोलत. नेहरु नेहमी, लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यांचं पालन-पोषण नेहमी सावधगिरीने केलं गेलं पाहिजे, असं म्हणत.
सर्च इंजिन गूगलही एका खास डूडलद्वारे बालदिन साजरा करत आहे. हे रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण डूडल गुरुग्रामच्या दिव्यांशी सिंघलने तयार केलं आहे. ७ वर्षीय या विद्यार्थिनीची गूगल डूडल थीम 'वॉकिंग ट्रीज' आहे, जी पुढच्या पिढीला जंगलतोड वाचवण्याचा संदेश देतेय.
राष्ट्रीय विजेती दिव्यांशी सिंघलला ५ लाख रुपयांची कॉलेज स्कॉलरशिप आणि २ लाख रुपये शाळेच्या टेक्नोलॉजी पॅकेजसाठी मिळणार आहेत. इतर पुरस्कारांसोबतच तिला गूगलच्या भारतीय कार्यालयामध्ये भेट दिली जाणार आहे.
गेल्या १० वर्षांपासून गूगल शालेय मुलांना, इंडियाच्या मुखपृष्ठासाठी डूडल बनवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. 'जेव्हा मी मोठा होईन, मला आशा आहे...अशा आशयाची या वर्षाची थीम होती
लहान मुलांचे अधिकार आणि शिक्षण याबाबत जागरुकता वाढवणं हा बालदिन साजरा करण्याचा मागचा हेतू आहे. बालदिनानिमित्त भारतातील अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
सर्वोच्च न्यायालय आज राफेल विमान डील आणि सबरीमाला प्रकरणावर निर्णय देणार आ....
अधिक वाचा