ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार- आरोग्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार- आरोग्यमंत्री

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारनं आणखी काही उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या तयारीत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे. लोकलमधून मोठ्या संख्येनं लोकं प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं शक्य होत नाही. त्यामुळे याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर काय पर्याय काढणार याबाबत उत्सुकता आहे.

काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या पदाधिकाऱ्य़ांशीही आरोग्यमंत्र्यांनी चर्चा केली असून घरूनच काम करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तसंच ऑनलाईन काम करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार असल्याचंही या बैठकीत ठरलं.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की,

- खाजगी कंपन्यांनी work from work ला मान्यता दिली आहे, कंपन्यामध्ये बैठका होणार नाही यासाठी कंपन्यांनी तयारी दाखवली आहे.

 

- सरकारी कार्यालयात कमीतकमी लोक येतील याची काळजी घेतली जाईल.

 

- मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्यासाठी कंपन्या सरकारला मदत करणार.- अँटी व्हायटल औषधं उपलब्ध करणार, फ्री औषध देण्यास कंपन्या तयार आहेत.

 

- ग्रामीण भागातील उद्योग बंद करू नये अशी कंपन्यांची विंनती आहे.

 

- आपण फेझ 2 मध्ये आहोत.- राज्यात एकूण 40 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.

 

- सेव्हन हिल्समध्ये योग्य ती व्यवस्था केली जात आहे.

 

- रेल्वेतून प्रवासाबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

- सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

 

- pharma, banking, लर्सन , बिर्ला, rilance इत्यादी सोबत चर्चा झाली.

 

मागे

Corona Virus : Work from Home हा पर्याय कितपत फायदेशीर?
Corona Virus : Work from Home हा पर्याय कितपत फायदेशीर?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढला असून महाराष्ट्रातला कोरोनाबाधित पहिल....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाच्या लसीचा पहिला प्रयोग 'त्या' ४५ जणांवर
कोरोनाच्या लसीचा पहिला प्रयोग 'त्या' ४५ जणांवर

जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनचं संकट आलेलं असतानाच दुसरीकडे कोरोना व्....

Read more