By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केले आहेत या सर्व केंद्रांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून तशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुगल मॅपवर या सर्व लॅब आणि केंद्रांची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.
जगभरात थैमान घालणारा कोरोना भारतातही फोफावत चालला आहे. देशात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, तरीही भारताची कोरोनाशी झुंज सुरु आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताने आतापर्यंत देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु केली आहेत. त्याचबरोबर लॅब आणि सॅम्पल कलेक्शन केंद्रांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.
याबाबत केंद्र सरकारने आपल्या विविध वेबसाईट्सवर माहिती दिली. ही माहिती सर्वसामान्यांना सोयिस्करपणे उपलब्ध व्हावी यासाठी हेल्थ अॅनलिस्टिक एशियाच्या डेटा टीमने संपूर्ण माहिती एकत्र करत गुगल मॅपच्या मदतीने भारताच्या नकाशाव्यावर प्रकाशित केली. त्यामुळे सर्वसामान्यांना सहज ही माहिती उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात 2 लॅब तर 5 सॅम्पल कलेक्शन केंद्र
गुगल मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्रात आजच्या घडीला मुंबई आणि नागपूर येथे लॅब सुरु आहेत. तर औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सॅम्पल कलेक्शन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार ज्याप्रकारे उपाययोजना करत आहे ते पाहून इतर देशही भारताचं कौतुक करत आहेत.
कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्य....
अधिक वाचा