ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ला मुदतवाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2020 09:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ला मुदतवाढ

शहर : देश

आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दिलेल्या सवलतीची मुदत वर्षअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयटी कर्मचारी आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरुन काम करु शकतील. त्यामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑफिसला जावे लागू शकते.

आयटी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या होत्या. हा कालावधी संपत आल्याने थेट आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोविड19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत दूरसंचार मंत्रालयाने अन्य सेवा प्रदात्यांना अटी व शर्तींमध्ये दिलेल्या सवलती 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवल्या आहेत.” असे ट्वीट दूरसंचार मंत्रालयाने केले आहे.

सध्या आयटी कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 85 टक्के घरुन काम करत आहेत, तर केवळ जिकिरीचे काम करणारे कर्मचारी कार्यालयात जात आहेत. काही ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, तर काही ठिकाणी रोटेशननुसार एक आड एक आठवडा कर्मचाऱ्यांना बोलवले जाते. बाहेरगावी राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या घरी कुटुंबियांजवळ आहेत. कोणी प्रियजनांसोबत राहता येत असल्याने आनंदात आहे, तर बऱ्याच जणांना मात्र वाढलेल्या कामाचा तापच होत आहे.

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत. सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत दिलेली मुभा नंतर 31 जुलै आणि आता थेट 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

 

मागे

लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई
लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 6 हजार 799 बेफिकीर पुणेकरांवर कारवाई

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांच....

अधिक वाचा

पुढे  

नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन', पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा उपक्रम
नवी मुंबईत 'मिशन ब्रेक द चेन', पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा उपक्रम

नवी मुंबईतील कोरोनाचा उद्रेक रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका आयुक्त अभिज....

Read more