ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला 'हा' नवा नियम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 22, 2020 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तुम्हीही IT कंपनीत काम करता, वाचा सरकारनं लागू केलेला 'हा' नवा नियम

शहर : देश

कोरोना व्हाययरसचा वाढता प्रादुर्भाव आणि या विषाणूमुळं उदभवलेली अडचणीची परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नव्यानं काही नियम लागू करण्यात आले आहेत. IT आणि BPO क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबतचे नवे निर्देश केंद्राकडून काढण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत कोरोनाचं वाढतं संकट पाहता त्यांना देण्यात आलेली घरूनच काम करण्याची सुविधा अर्थात Work From Home या सुविधेच्या कालावधीत आणखी वाढ करण्यात आली आहे.

मंगळवारी याबाबतच अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्याअंतर्गत IT आणि BPO या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत घरुनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी या सुविधेचा अखेरचा दिवस होता. पण, आता मात्र Work from home मध्ये वाढ करुन देण्यात आल्याचंच स्पष्ट होत आहे.

दूरसंचार विभागाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीला या क्षेत्रांमध्ये काम करणारे जवळपास ८५ टक्क्यांहून जास्त कर्मचारी हे घरूनच काम करत आहेत. तर, अत्यावश्कत असल्या कारणामुळं इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावं लागत आहे.

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येनं ११ लाखांचाही आकडा ओलांडला आहे. अतिशय वेगानं वाढणारी ही रुग्णसंख्या पाहता संभाव्य संकट टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं केंद्र आणि राज्य शासनांकडून उचलण्यात येत आहेत.

मागे

ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू
ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू

झारखंडमधील धनबादमध्ये कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी
मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था....

Read more