ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

या बैठकीत राज्यात जी परिस्थिती आहे, त्याची चर्चा झाली. महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहे की राज्यात एकूण 40 रुग्ण आहे. त्यात एकाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांमध्ये 26 पुरुष आणि 14 महिला आहे. त्यात एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे.

तसेच या बैठकीत बस किंवा ट्रेन बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही. जर गरज असेल तर जनतेने प्रवास करावा. बस आणि ट्रेन या अत्यावश्यक सुविधा आहेत. त्यामुळे त्या बंद ठेवणार नाही. मात्र जनतेने अनावश्यक प्रवास टाळला नाही तर बस ट्रेन बंद ठेवावी लागेल, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंची दुकान वगळता इतर सर्व दुकानदारांनी स्वत:हून दुकान बंद करावी. सरकारी ऑफिस बंद होणार नाहीत. पुढील 15 ते 20 दिवस महत्त्वाचे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पुन्हा आवाहन करतो आहे, आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं. .

मला खात्री आहे जनतेला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे. जसं पुण्यामध्ये काही लोकांनी दुकाणं बंद केले आहेत. मुंबईसह इतर शहरातील दुकानदारांनाही आवाहन करतोय की जीवनाश्मक वस्तूंशिवाय इतर दुकाणं चालू ठेवू नये. त्यांनी स्वत:हून ती दुकाणं बंद केली तर चांगलं होईल.

सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी नाहीमुख्यमंत्री

मुंबईमध्ये जी बातमी फिरते की, सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी दिलेली नाही. मात्र, उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतो आहोत. 50 टक्के उपस्थिती ठेऊन कामकाज चालू ठेवता येईल का? तोही विचार आम्ही करतोय. एकूणच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकार म्हणून आवश्यक पाऊलं उचलत आहोत

मागे

मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार...
मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार...

लोकल, मेट्रो सेवा बंद करणार नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्य....

अधिक वाचा

पुढे  

#Corona रुग्णांशी दुजाभाव नको; आरोग्यमंत्र्यांचा इशारा
#Corona रुग्णांशी दुजाभाव नको; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

Corona कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या ४२वर पोहोचल्याचं सां....

Read more