ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इलेक्ट्रिक गाड्या झाल्या स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 12:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इलेक्ट्रिक गाड्या झाल्या स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय

शहर : देश

तुम्ही गाडी घेण्याबद्दल विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे... त्यातही तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर दुधात साखर... कारण, मोदी सरकारनं -व्हेईकलला (e-vehicle) प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय जाहीर केलाय. सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार, तुम्ही व्हेईकल विकत घेतली तर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही. इतकंच नाही तर तुम्ही व्हेईकलची नोंदणी पुन्हा करत असाल तरीही तुम्हाला रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही.

व्हेईकलला प्रोत्साहन

बॅटरी ऑपरेटेड वाहनांवर रजिस्ट्रेशन फी संपवून सरकारन देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिलंय. अशा वाहनांवर रजिस्ट्रेशन शुल्क हटवण्यावरून रस्ते परिवहन मंत्रालयानं ड्राफ्ट नोटिफिकेशनही जारी केलंय. नव्या नियमानुसार, सर्व प्रकारच्या इलेक्ट्रीक गाड्या मग त्या दोन चाकी असो तीन किंवा चार चाकी... बॅटरी ऑपरेटेड वाहनांच्या खरदीवर यापुढे रजिस्ट्रेशन फी द्यावी लागणार नाही. मोदी सरकारच्या टॉप अजेंड्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचाही समावेश आहे. देशात २०२३ पर्यंत थ्री व्हिलर आणि २०२५ पर्यंत टू व्हिलर व्हेईकलचीच विक्री व्हावी, अशीही सरकारची इच्छा आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, देशात सर्व इलेक्ट्रीक थ्री व्हिलरवर नंबर प्लेट अनिवार्य केली जाईल. रस्ते परिवनह मंत्रालयानं व्हेईकल थ्री व्हिलरच्या नंबर प्लेटला हिरवा आणि सफेद रंग असायला हवेत, असे आदेश अगोदरच दिलेत.

 

मागे

निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा, हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर
निसर्गाने दिला सतर्कतेचा इशारा, हिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर

सूर्याचा दाह वाढू लागल्यानंतर बर्फाच्छादित पर्वतरांगांकडे सर्वांची पावल....

अधिक वाचा

पुढे  

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र
सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र

शाहबाद ते जयपूर या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात येत अ....

Read more