By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यभरात सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला (Gram Panchayat Election Results ) सुरुवात झाल्यापासून शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, आता हा ट्रेंड बदलताना दिसत आहे. भाजपने आता शिवसेनेला मागे टाकत तब्बल 426 जागांवर मुसंडी मारली आहे. तर सध्या शिवसेना 422 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. एकूणच सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस 299, राष्ट्रवादी 299, मनसे 11 आणि इतर पक्ष 614 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात महाविकासआघाडीचा वेग पाहता भाजपचा टिकाव लागणार नाही, असे मानले जाते. मात्र, गेल्या दोन तासांत भाजपने जोरदार कमबॅक करत शिवसेनेलाही मागे टाकले आहे.
शिवसेनेची जोरदार घौडदौड
महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शिवसेनेला मोठे यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत ज्या भागांमध्ये शिवसेनेला यश मिळाले नव्हते तेथेही सेनेचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही बाब शिवसेनेसाठी सकारात्मक मानली जात आहे.
मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (Mhaisal)ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. म्हैसाळ ही जयंत पाटील (Jayant Patil) यांची सासुरवाडी आहे. 17 जागांच्या या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे पाहुणे राऊळे उभे होते. मात्र भाजपने इथे मोठा विजय मिळवला. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला.
एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.
केंद्र सरकार कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 52 दिवसा....
अधिक वाचा