By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : धुळे
धुळे - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला कांदा आणि मका पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शहरात गुरुवारी दुपारी अचानक अर्धा तास वादळी पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले. पावसामुळे शेतातील उभ्या कापसाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पावसाने शेतकर्या चे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे धुळेकरांची एकच धावपळ उडाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला कांदा, मका, बाजरी भिजली असून काहींनी मिळेल त्या कापडाने धान्य झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, जोरदार पावसामुळे धान्य ओले झाले. शिवाय, शेतात उभा असलेला कापूसही पूर्ण भिजला.
याआधीच्या अवकाळी पावसाची भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळालेली नसतांना आता गुरुवारी झालेल्या पावसात पिकांचे अधिक नुकसान शेतकर्याआला भोगायला आले आहे. आता या नुकसानीचे पंचनामे केव्हा होतील आणि मदत केव्हां मिळेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
मुंबई - आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, असं मुंबई....
अधिक वाचा