ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवाद्यांकडून सैन्यदलाच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवाद्यांकडून सैन्यदलाच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला

शहर : देश

शनिवारी सकाळी भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील रामबन भागात असणाऱ्या बटोट परिसरा ही घटना घडली.

रामबन येथील वरिष्ठ पोलीस अधिक्षक अनिता शर्मा या इतर काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत लगेचच घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर Chakwa  कँप येथे हा हल्ला केला.

सध्याच्या घडीला या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं वृत्त आलेलं नाही. तसंच कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहितीसुद्धा समोर येत आहे. असं असलं तरीही सैन्यदल, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा या भागात शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयितांनी बटोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ येथे एक वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर या ठिकाणी हे दोन संशयित इसम आणि सैन्यदलामध्ये गोळीबार झाल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

शुक्रवारी सैन्यदलाला काश्मीरच्या उत्तरेकडे असणाऱ्या कुपवाडा येथील नियंत्रण रेषेपाशी दहशतवादी आढळले असल्याच्या माहितीनंतर ही घटना घडली आहे. याविषयीचा एक व्हिडिओसुद्धा एएनआय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत मोठ्या घुसखोरीचा कट रचण्यात आला आहे. ज्या माध्यमातून दहशतवादी आणि शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत पाठवली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या घुसखोरीमध्ये स्थानिक नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत या कारवायांना निकाली काढण्याचा दहशतवादी संघटनांचा मनसुबा असल्याचं समोर आलं आहे.

 

मागे

पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो
पाकिस्तान असा देश आहे जो दहशतवाद्यांना पेंशन देतो

यूएनमध्ये पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्या भडकाऊ भाषणाला भारताच्या....

अधिक वाचा

पुढे  

देशभरात नवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची रीघ
देशभरात नवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची रीघ

आजपासून घटस्थापना, शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस घर....

Read more