By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : greater Noida
नवरा दारू पिऊन टाइट असल्याचं लक्षात येताच भर मांडवात नवर्या मुलीने लग्न मोडल्याची घटना घडली आहे. पण, सुदैवाने आलेल्या पाहुण्यांपैकीच एकाने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवल्याने त्या तरुणीचं फिल्मी स्टाईल लग्न लागलं आहे. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे घडली. बुधवारी होणार्या एका लग्नासाठी वरात दारावर पोहोचली. नवरा मुलगा घोडीवरून उतरून मंडपाकडे चालू लागला. पण, त्याची पावलं अडखळत, लटपटत पडत होती. बोहल्यावर आल्यानंतर तर त्याला त्याची वरमालाही पकडता येईना. ऐन लग्नात नवरा मुलगा असा पिऊन तर्र असल्याचं लक्षात येताच नवरी संतापली आणि तिने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबीयांनीही तिला समर्थन दिलं. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. पण, नवरी निर्णयावर ठाम होती. त्यामुळे लग्न मोडलं आणि वरात परत निघून घेली.
वधुपक्षाने लग्न मोडल्याचं जाहीर केलं खरं, पण आता वरात परत गेल्याने वधुपक्ष काळजीत पडला होता. अखेर लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळीतून एक तरुण पुढे आला आणि त्याने लग्नाची तयारी दाखवली. या लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांनी होकार दिला आणि त्याच मांडवात एकदम फिल्मी स्टाईल लग्न पार पडलं.
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच....
अधिक वाचा