ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जीएसटी करात मोठे बदल,जीवनावश्यक वस्तू महागणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जीएसटी करात मोठे बदल,जीवनावश्यक वस्तू महागणार?

शहर : देश

केंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता आहे. केंद्राला मिळणाऱ्या महसूलामध्ये घट झाल्यामुळे जीएसटी परिषदेत गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर वाढवण्यात येणार आहे. जीएसटी दर 5 टक्क्यांवरुन वाढवून तो 10 टक्क्यांपर्यंत केला जाणार आहे. या बदलामुळे सरकारला एक हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.जीएसटी स्लॅबमध्ये चार स्लॅब आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर 5, 12, 18 आणि 28 टक्के स्लॅबचा समावेश आहे. पाच टक्के जीएसटी हा गरजेच्या वस्तू अन्न, हॉटेल, कपडे यावर लावला जातो.

प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार 1.18 कोटी रुपयांचे महसूल जीएसटीच्या माध्यमातून कमवते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा आहेतदरम्यान याच पार्श्वभूमीवर जीएसटी पॅनलमध्ये समावेश असलेले तसेच इतर राज्याचे अर्थमंत्री येणाऱ्या 15 डिसेंबर रोजी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत जीएसटीमध्ये होणाऱ्या कमाईत वाढ करण्यासाठी जीएसटी स्लॅबच्या करात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पुढच्या वर्षी कार, तंबाकू आणि कोळसा उत्पादन महाग होऊ शकतात. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जीएसटीचे दर वाढल्यानंतर वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.

मागे

उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...
उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...

देशभर उन्नाव आणि हैदराबाद बलात्कार प्रकरणी रोष असताना दिल्लीत एक अजब घटना ....

अधिक वाचा

पुढे  

बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित
बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापिरनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपा....

Read more