ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

शहर : देश

देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कोणीही घाबरुन जाऊ नये. स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यावर मात करता येते. जे परदेशातून प्रवास करुन आले आहेत, त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे, आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचे विलगीकरण अनिवार्य आहे. स्वतंत्र शौचालय तसचे वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावे. या खोलीत कुटुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावे लागल्यास किमान एक मिटरचे अंतर ठेवावे, असे आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ही आहेत मार्गदर्शक तत्वे -:

  • कोरोना व्हायरस बाधित रूग्णाने ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांच्याशी संपर्क ठेऊ नये.
  • तसेच कोरोना बाधित रूग्णाने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये
  • अशा व्यक्तीने आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धूवावेत. किमान २० सेकंद हात चांगले साबणाने धुणे
  • तसेच अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरावेत. कोरोना व्हायरस बाधित व्यक्तीने सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्ट करावेत.
  • जर कुणाला खोकला, ताप, श्वसनात अडचण अशी लक्षणं आढळली तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क साधावा.
  • कोरोना व्हायरसची लक्षणे वाटू लागली तर त्याने जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क  किंवा ०११२३९७८०४६ या हेल्पलाईन  नंबरवर संपर्क साधावा.
  • घरातल्या विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसांचा आहे, असेही या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

मागे

कोरोना व्हायरसचा कहर संपला, चीन सरकारकडून जाहीर
कोरोना व्हायरसचा कहर संपला, चीन सरकारकडून जाहीर

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर संपल्याचे चीन सरकारच्या प्रवक्त्यांमार्फत ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुळे  ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
कोरोनामुळे ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पा....

Read more