By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 05:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - सांताक्रूझमधील रस्त्यावरील पदपथ अनेक अनधिकृत बड्या धंदेवाल्यांची व्यापलेले आहेत. गर्दीच्या वेळी तेथून चालताही येत नाही. तथापि मुंबई महापालिकेच्या एच/पूर्व विभागातील अधिकारी दरदिवशी येथे कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी छोट्या-छोट्या धंदेवाल्यावर कारवाई करतात. तर बेकायदेशीरपणे पदपथ व्यापून धंदे करणारे दुकानदार आणि फेरीवल्यांना हातही लावित नाहीत. आज तर सांताक्रूझ पूर्व येथील उड्डाण पूलाजवळील फेरीवाल्यांवर कारवाई करतानाही त्यांनी बड्या धंदेवाल्यांना अभय दिल्याचेच दिसून आले. काही तरी कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी छोट्या गरीब धंदेवाल्यांचे समान घेऊन ते अंधेरीत एमआयडीसीच्या गोडावूनमध्ये त्यांनी जमा केले.
या संदर्भात जाब विचारताच हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नाही, असे एच पूर्व विभागाच्या अधिका-यानी उत्तर दिले. खरेतर कारवाई करायचीच तर ज्यांनी पदपथ व्यापले आहेत, त्याच्यावर करणे गरजेचे आहे. पण तशी कारवाई केली जात नाही. त्यामुळेच अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांचा आकार पदपथपर्यंत वाढविल्याचे दिसत आहे.
जेव्हा पालिकेची गाडी येते तेव्हा कारवाई करणारेच दुकानदारांना समान आत घेण्यास सांगतात. गाडी गेली की, दुकानदार पुन्हा दुकानाच्या बाहेर समान ठेवतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे या अनधिकृत बड्या धंदेवाल्यांकडून पालिका कर्मचारी, अधिका-यांना मलिदा मिळत असल्याची चर्चा आहे. काही धंदेवाले तर रस्त्यावरच ठाण मांडतात. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी एका कोप-यात कुणालाही अडचण होत असलेल्या नसलेल्या धंदेवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
तरी संबंधित विभाग अधिका-यांनी याबाबतीत तातडीने लक्ष्य घालून अनधिकृत फेरीवाले व धंदेवाल्यांवर कारवाई करून प्रवाशांना व रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नाशिक - लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने प....
अधिक वाचा