By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - ज्येष्ठ नागरिकांना किंवा कुटुंबातील वयोवृद्ध पालकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे, छळणारे, त्याचबरोबर त्यांच्याशी गैरव्यवहार करणा-या व्यक्तींना सहा महीने तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. किंवा दोन्ही शिक्षाची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर केले आहे. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना त्रास देणा-या कुटुंबातील व्यक्तीला चांगलाच धास बसणार आहे.
ज्येष्ठ नागरिक कायदा आणि पालक कल्याणकारी कायदा, 2007 या कायद्यात सुधारणा केली जाणार असून हे विधेयक सामाजिक न्याय मंत्री थवरचंड गेहलोत यांनी लोकसभेत सादर केले. त्यावर आधारित ज्येष्ठ व्यक्तींसोबत गैरव्यवहार प्रकरणी किंवा शारीरिक, आर्थिक, भावनिक अशा कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचा समावेश यात केला आहे. काळजी न घेणे, पालकांना सोडून देणे, त्यांना भावनिक किंवा शारीरिक त्रास देवून हतबल करणे अशा छळणा-यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, सुधारित विधेयकाद्वारे वृद्धांसाठी एका लवादाची स्थापना करण्यात आली असून तेथे ज्येष्ठ व्यक्तींना दाद मागता येवू शकते. तसेच 80 वयावरील ज्येष्ठांना या लवादाकडे केलेले अर्ज 60 दिवसांत निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच संबंधित समस्यांची तत्काळ दखल घेण्यासाठी पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक आणि पोलिस अधिकारी असणार आहेत. प्रामुख्याने ही दोन पथके या विषयांवर गांभीर्याने दखल घेतील.
कोल्हापूर - सगळीकडे लग्नाची धुमधम सुरू आहे. लग्नाची वरा....
अधिक वाचा