ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 09:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

शहर : देश

हाथरस आत्महत्या प्रकरणावर बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर टीका होत आहे. बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, ‘सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील.’ आमदारांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी समाचार घेतला आहे. (Hathras – The need for rites on girls as well as boys says Smriti Irani)

स्मृती इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणानंतर काही जण मुलींना उपदेश देत आहेत. ते म्हणातात की, मुलींना संस्काराची गरज आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की कुटुंबासाठी मुलगा आणि मुलगी हे एक असून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणाने मी खूप अस्वस्थ झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठित केली. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपवले. लवकरच त्याचे सत्य समोर येईल.

काय म्हणाले होते सुरेंद्र सिंह?

भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, “मी केवळ एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतोय आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात.

बलात्कारानंतर गळा आवळून हत्येचा प्रयत्न

यूपीच्या हाथरस (Hathras) जिल्ह्यात राहणारी मुलगी, 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, चार नराधमांनी तिला खेचत बाजूला नेले. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार (GangRape) केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. बोलता येऊ नये म्हणून पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले होते. 15 दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. 22 सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. तिने दिलेल्या जबाबावरून चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

मागे

महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी
महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी

तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला वकिलाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली ....

अधिक वाचा

पुढे  

WHOची मोठी माहिती : केव्हापर्यंत येणार कोरोनाचं 'कारगर व्हॅक्सीन'
WHOची मोठी माहिती : केव्हापर्यंत येणार कोरोनाचं 'कारगर व्हॅक्सीन'

जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्स....

Read more