ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिलायन्स इंडस्ट्रीच्या विक्रमी नफ्याची नोंद पाहिली का?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीच्या विक्रमी नफ्याची नोंद पाहिली का?

शहर : देश

     मुंबई - डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे. या कंपनीला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत झाला. कोणत्याही भारतीय कंपनीने नोंदवलेला हा सर्वोच्च तिमाही नफा आहे.


         या कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत ११,२६२ कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. या कंपनीच्या इंधन शुद्धीकरणासह रीटेल व्यापार व टेलिकॉम व्यवसायाने नफ्यात लक्षणीय वाटा उचलला आहे. पण या तिमाहीत रिलायन्सच्या एकत्रित महसुलात चार टक्के घट नोंदवण्यात आली. रिलायन्सने डिसेंबरअखेरीस १,६८,८५८ कोटी रुपये महसूल प्राप्ती केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंतचा कमावलेला सर्वाधिक नफा आहे. 


         डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला ११ हजार ६४० कोटींचा नफा मिळाला. पण कंपनीच्या महसुलात विक्रमी नफा मिळवून देखील घसरण झाली आहे. कंपनीच्या महसुलावर तेल आणि रसायने उद्योगाच्या निराशाजनक कामगिरीमुळे परिणाम जाणवला. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत १६८८५८ कोटींचा महसूल मिळाला. ज्यात १.४ टक्के घसरण झाली. किरकोळ व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न रिलायन्स करणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ अखेर कंपनीवर ३०६८५१ कोटींचे कर्ज आहे. मार्च २०१९ अखेर रिलायन्सवर २८७५०५ कोटींचे कर्ज होते.
 

मागे

मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी
मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी

      मुंबई -  ५० मिमी जाडीच्या पिशव्यांनाही बंदी घालण्यात आली. मात्र  ....

अधिक वाचा

पुढे  

जम्मू-काश्मिरच्या दहा जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू
जम्मू-काश्मिरच्या दहा जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू

      श्रीनगर - जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० कें....

Read more