By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - आपल्या हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण घराच्या किंमती आणि न परवडणारे व्याजदर यामुळे ते घेणं शक्य नसते. पण एचडीएफसी बॅंकेने अशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी आपल्या गृहकर्जावरील व्याजदर ०.०५ दराने कमी केला आहे. त्यामुळे हक्काचे घर घेणे आता आणखी सोपे होणार आहे. शुक्रवारी कंपनीने यासंदर्भातील घोषणा केली.
याआधी स्टेट बॅंक ऑफ इंडीया (एसबीआय) ने देखील आपले गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. स्टेट बॅंकेने १ जानेवारी २०२० पासून ८.०५ व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करुन ते ७.८० टक्के केले आहे. आम्ही गृहकर्जावरील व्याजदर ०.०५ टक्के कमी केल्याचे एचडीएफसीने जाहीर केले.
हे नवे व्याजदर ६ जानेवारीपासून लागू होणार आहेत. गृहकर्जावरील हे बदलणारे दर आरपीएलआरच्या आधार ठरवले जातात. एचडीएफसीचे नवे दर हे ८.२० टक्के ते ९ टक्क्यांच्या आत राहणार आहेत.
मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलाविरोधात पोलिसांनी छेडछ....
अधिक वाचा