ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'तो' आहे स्मशानभूमीतला स्वच्छतादूत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'तो' आहे स्मशानभूमीतला स्वच्छतादूत

शहर : कोल्हापूर

        कोल्हापूर - स्मशानभूमी म्हटल्यावर अनेकांच्या अंगावर काटा य़ेतो. काहीजण तर या ठिकाणी न जाण्याचे अनेक बहाणेही देतात. याच या स्मशानभूमीत आयुष्याचा अंत लिहिलेला असतो. इथे रोज कुणाचं ना कुणाचं सरण जळत असतं. जिथं माणसाच्या प्रवासाचा शेवट होते त्य़ा स्मशानात कमालीची अस्वच्छता असते. ही बाब हेरत सांगलीतील  इस्लामपूरच्या चंद्रशेखर तांदळे या तरुणाने स्मशानभूमींच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. 

     आतापर्यंत त्याने ३३३ स्मशानभूमी स्वच्छ केल्या आहेत. चंद्रशेखरने ५०० स्मशानं स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. या अनोख्या उपक्रमासोबतच तो अंधश्रद्धा निर्मुलनाचंही काम करत असतो. स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत गल्ली बोळापासून ते अगदी गटारं आणि चौकांपर्यंत बरीच ठिकाणं स्वच्छ होत आहेत. त्यामुळे स्मशानही स्वच्छ असलं पाहिजे असा विचार त्याने सर्वांपुढे ठेवला. या विचारातून त्याने  माणसाला अखेरचा निरोप देणारं हे ठिकाण म्हणजेच स्मशानभूमीसुद्धा कायम स्वच्छ ठेवण्याचं अभियान हाती घेतलं आहे. 

      स्मशानात मृताच्या  अंत्यसंस्कारासाठी आप्तांनी केलेल्या विधींनंतर होणाऱ्या अस्वच्छतेमुळं कुठेतरी या अंत्यविधींचीही कुचंबना होत होती. पण, चंद्रशेखरच्या या उपक्रमामुळे स्मशानभूमीही नीटनेटकी दिसू लागली आहे. जे काम प्रशासनानं करणं अपेक्षित होतं तेच काम हा अवलिया करतो हे मात्र सर्वतोपरी कौतुकास्पदच म्हणावं लागेल.

मागे

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

        मुंबई - ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं शुक्रव....

अधिक वाचा

पुढे  

कोरेगाव-भीमावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
कोरेगाव-भीमावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

      पुणे - कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला विजयस्तंभावर २०२ व्या शौर्यदिव....

Read more