By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 25, 2020 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्य अधिक महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी दैनिक 'सामना'ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी आधी आरोग्य महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी अर्थव्यवस्था की आरोग्य, ही तारेवरची कसरत आहे, असेही ते म्हणालेत. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत घेतली.
आज कोरोनाची स्थिती तशी गंभीर आहे. मुंबईत नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र, धोका कायम आहे. अन्य शहरातही धोका कायम आहे. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन मी उठवतोय. मी अजिबात असे म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड्या करत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्य महत्वाचे आहे. कोरोनाबरोबर जगायला शिकायचे म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकले पाहिजे. त्यामुळे आता जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करत आहे. त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असले तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. कोरोनाच्या काळात या सर्वाचे तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, लॉकडाऊन करताना जतनेच्या आरोग्याचा तसेच अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी विचार करणे गरजेचे असते. लॉकडाऊनचा विचार करताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परत परत शहरांत लॉकडाऊन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाही. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारे आणि बोलणारे जगामध्ये कोणीच नाही, असे सांगत उद्धव यांनी सगळीकडेच वेळोवेळी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सूचित केले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने कडक न....
अधिक वाचा