ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हवामान खाते, पाऊस आणि शाळा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हवामान खाते, पाऊस आणि शाळा

शहर : मुंबई

मुंबईत आज अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने कालच हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला त्यामुळे शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा फेल ठरवीत आज पावसाने विश्रांती घेणेच पसंत केल्याचे पाहायला मिळाले.

जून अखेरपासून सुरू झालेल्या पावसाने विदर्भ मराठवाडा, नागपूर वगळता अन्यत्र जोरदार बरसात केली. मात्र मुंबईत हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून तीन वेळा शाळा महाविद्यालयांना सुट्टया जाहीर केल्या गेल्या. मात्र या तिन्ही वेळा अपेक्षेप्रमाणे पाउस बरसला नाही. तोच अनुभव आजही येत आहे.

आज कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात दिली आहे. पण पावसाने मात्र सकाळ पासूनच विश्रांती घेतलेली दिसली. काल संध्याकाळी मध्य मुंबईत ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाट काही वेळ पाऊस कोसळला. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आता परतीचा पाऊस सुरू असून उद्यापर्यंत मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

पावसाचे अनुमान वारंवार चुकत असल्याने हवामान खात्याच्या कार्यशैली वर प्रश्न उपस्थित होतं आहेत. मात्र ह्यामुळे होणारे विद्यार्थ्यांच नुकसान ही लक्षात घेतलं गेल पाहिले. असे असले तरी सुट्ट्यांमुळे मुले मात्र खुश आहेत. 

मागे

नासाही 'fail'
नासाही 'fail'

7 सप्टेंबरच्या चंद्रयान 2 च्या मोहिमेतील विक्रम लँडरचा तुटलेल्या संपर्काने....

अधिक वाचा

पुढे  

महापालिका कर्मचार्‍यांना 15 हजार रुपये बोनस जाहीर
महापालिका कर्मचार्‍यांना 15 हजार रुपये बोनस जाहीर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता गृही....

Read more