ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापुरात धुवांधार, घरातील सदस्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापुरात धुवांधार, घरातील सदस्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

शहर : कोल्हापूर

पावसाचा वाढता जोर पाहता कोल्हापुरात प्रशासन सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना त्वरित दुसरीकडे स्थालांतरित होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे.

धरणक्षेत्र आणि जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आज (5 ऑगस्ट) रात्रीच शाळा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे घरातील सदस्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

कोल्हापुरात गेल्यावर्षी प्रचंड मोठा महापूर आला होता. या महापुराची झळ अजूनही काही कुटुंब सोसत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाचा अनुभव पाहता चिखली आणि आंबेवाडीसह करवीर तालुक्यातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जोतिबा केर्ली रस्ता खचला

मुसळधार पावसामुळे जोतिबा केर्ली रस्ता खचला आहे. गेल्यावर्षीदेखील याच ठिकाणी रस्ता खचला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांसमोर गेल्यावर्षीच्या महापुराची आठवण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जोतिबाच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील जवळपास 86 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

राधानगरी धरण 90 टक्के भरलं आहे. शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नंदगाव इथल्या प्राथमिक शाळेत पाणी शिरले, तर कोवाड बाजारपेठही जलमय झाली आहे.

धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

मागे

Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 म....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत पावसाने मोडला 46 वर्षांचा विक्रम, पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
मुंबईत पावसाने मोडला 46 वर्षांचा विक्रम, पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले. कुलाब्यामध....

Read more