By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काल सकाळपासून पडत असलेल्या पावसाने अजूनही उसंत घेतलेली दिसत नाही. ह्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई सोबत वसई,विरार नालासोपारा पालघर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबईच्या दादर भायखळा , हिंदमाता परळ भागात पाणी भरले असून पालघर, विरार, नालासोपारा, वसईच्या स्टेशन परिसर व सखल भागात पाणी भरले आहे. मुंबईच्या सायन भागात गुडगाभर पाणी साचले आहे.
रेल्वे कोलमडली
गणेशोत्सवा निमिताने अनेक भाविक आपआपल्या गावी गेल्याने लोकल ची गर्दी कमी असल्याचे 2 दिवस जाणवत होते. मात्र जोरदार पावसाने लोकलच वेळापत्रक कोलमडल त्यामुळे लवकरच कामावर पोहोचण्यासाठी प्रवाश्यांनी घाई केलेली दिसून येते. गर्दी पासून सुटकेचा निश्वास टाकलेल्या प्रवाश्यांना भासलेली गर्दीची कमतरता पावसाने भरून काढली अशी प्रतिक्रिया काही ठिकाणी उमटली.
पश्चिम रेल्वेला चर्चगेट ते वसई च्या दरम्यान ट्रेन सुरळीत असून वसई ते विरार च्या दरम्यान रेल्वे बंद असल्याचे ट्वीट रेल्वेने केले आहे. तर हार्बर व मध्य रेल्वेलाही ह्याचा फटका बसला आहे.
#MumbaiRainsLive, WR suburban services are running without any disruption between Churchgate & Vasai Road. However, due to track failure at Virar the trains are running with less frequency between Vasai Road & Virar. #WRUpdates #MumbaiRain @drmbct
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
शाळा बंद
मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जल शक्ति मंत्रालयाच्या पेयजल विभागातर्फे जाहीर केलेल्या यादीनुसार जम्मू ....
अधिक वाचा