By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचे पाणी शिरले. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पाहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यानंतर शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेय.
Maharashtra: Severe waterlogging in Mumbai's Sion area due to heavy rainfall
— ANI (@ANI) September 23, 2020
India Meteorological Department predicts heavy rainfall at isolated places over Mumbai during the next 24 hours pic.twitter.com/CEoIlpZsIJ
मुंबईत ३०० मिमी पाऊस झाला तर पाणी साठणार नाही का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर विरोधकांचे काम टीका करणे आहे, असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. मागील ४० वर्षांपासून मुंबईत १०० मिमी पाऊस झाला तरी काही भागात पाणी साठतेच, असे सत्ताधाऱ्यांनी म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळलेत.
लोकल सेवेअभावी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील चाकरमान्यांचे हाल सुरु आहे....
अधिक वाचा