ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2019 09:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा

शहर : मुंबई

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सकाळी काळे ढग गोळा झाले होते. मुसळधार पावसानंतर आता आकाश पुन्हा निरभ्र झाले आहे. गेल्या आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होतीमुंबईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळी मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. दक्षिण मुंबईत आज हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उपनगराच्या काही भागात चांगला पाऊस कोसळणार असल्याचेही म्हटले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अरबी समुद्रात आज दुपारी 2.44 मिनिटांनी हायटाईडचा इशारा दिला आहे. अशावेळी पाऊस असल्यास मुंबईच्या अनेक भागात पाणी साचू शकते. भरतीच्यावेळी समुद्राजवळ जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागे

मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले
मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले

मुंबईत मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले. त्या दोघांचा शोध घेण्यात येत ....

अधिक वाचा

पुढे  

पावसाचा जोर वाढल्यानं नदीनाल्यांना पूर , गाड्या गेल्या वाहून
पावसाचा जोर वाढल्यानं नदीनाल्यांना पूर , गाड्या गेल्या वाहून

छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल....

Read more