ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापूर सांगलीत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापूर सांगलीत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

शहर : मुंबई

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये आता कुठे पावसाने जरा विश्रांती घेतली होती. त्यामुळे तिथे रहिवाशांसाठी मदत कार्याला वेग आला होता. सर्व स्तरातून मदत येऊन पोहोचत आहे. रहिवासी या महापुराच्या धक्क्यातून अजून पुरते सावरलेले नसतानाच पुणे वेधशाळेने या तिन्ही जिल्ह्यात पुन्हा एकदा येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्हे जलमय झाले होते. चार लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले व राष्ट्रीय सुरक्षा दलाच्यावतीने पथककांनी अनेकांचे प्राण वाचले. आठ दिवसात पाणी असलेल्या भागात पावसाने उसंत घेतली . पाणी ओसरू लागले. अनेक ठिकाणी चिखल झाला आहे.

लाखो लोकांचे संसार धुळीस मिळाले आहे. त्यातून आता मिळणार्‍या मदतीने सावरण्याचे रहिवाशी प्रयत्न करीत आहेत. अशा स्थितीत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये धाकधूक वाढली आहे. अजून सांगलीत काही गावं पाण्याखाली आहेत. सांगलीत सुखवाडी, ब्रह्मनाळ, आमनापूर यासारख्या गावात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचलेले आहे. पाऊस थांबल्याने बचाव कार्याला वेग आला होता. पुन्हा पाऊस सुरू झाल्या मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. कोल्हापुरातील शिरो, आंबेवाडी, चिखली आदी गावांमध्ये पाणी साचलेले आहे. शिरोळ तालुक्यात दहा हजार लोक अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अशा स्थितीत पुन्हा पाऊस कोसळला तर प्रशासनासमोर मोठ संकट  येण्याची शक्यता आहे

मागे

कोकणातील पूरस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष
कोकणातील पूरस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष

 रत्नागिरी कोल्हापूर सांगली प्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ....

अधिक वाचा

पुढे  

नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज
नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज

संगमनेर तालुक्यात पाटगावात जीवघेण्या नांगरणी स्पर्धेत बैल उधळले आणि स्पर....

Read more