ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, दुपारी हाय टाईडचा इशारा; रेड अलर्ट जारी

शहर : मुंबई

कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल केले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.

मुंबई शहरातील कुलाबा शहरात एक वाजेपर्यंत सुमारे २६९ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ उपनगरी भागात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून येत्या २४ तासांत जोरदार मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली.

मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कालपासून सुरु आहे. रात्री  भर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दरम्यान, दुपारी १२.४५ वाजता मुंबईतही भरतीची (हाय टाइड) शक्यता आहे.

 समुद्रात .५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. लोकांना सावधनतेच्या इशारा देण्यात आला आहे. लोकांनी समुद्रात जाऊ नका तसेच  समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

पुढे  

अतिवृष्टीमुळे पालिकेचे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन
अतिवृष्टीमुळे पालिकेचे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्रभर कोसळत अस....

Read more