By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजपासून सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून सुरु झाल्याची वर्दी दिल्यानंतर कोकणात पाऊसच पडलेला नाही. सिंधुदुर्गात काही ठिकाणी तुरळक पाऊस वगळता रत्नागिरी, रायगडमध्ये तर चक्क ऊन पाहायला मिळत आहे. मुंबईतही तिच परिस्थिती आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्य तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. गुरुवारी मान्सून दक्षिण कोकण, गोव्यात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तो पोहोचलेला नाही.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आलाय. मात्र त्यानंतर आठवडाभर पाऊस होणार नसल्याने पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचा सल्लाही हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलत दे....
अधिक वाचा