By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 06:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे विशेषत रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा वाढविण्यात आली. असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटविले, तेव्हापासून पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांचा जळफळाट सुरू आहे. त्यातच पाकची गुप्तहेर संघटना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतात मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्याचा कट टाकल्याची माहिती मिळताच अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. देशातील प्रमुख शहरे विमानतळ रेल्वे आदी ठिकाणी हल्ले होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असू शकतो. त्यासाठी दहशतवादी गुजरातच्या समुद्रमार्गे भारतात घूसण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुजरातमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
गुजरात समुद्रात सुरक्षा दलाची गस्त सुरू आहे. जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्यात आली आहे. तिथे शाळा आणि कार्यालय सुरू आहेत. काश्मिरात काही ठिकाणी अजूनही संचारबंदी लागू आहे. दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावर पोलिस तैनात आहेत
स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी महार....
अधिक वाचा