ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी

शहर : मुंबई

           ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता पार्ट्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले.


           हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज आणि रोस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या निमित्तानं आयोजित पार्ट्यांमध्ये फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय वाजवता येणार नाहीत. कोणत्याही प्रकारची गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी त्यासाठीचे परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स’ची (पीपीएल) परवानगी घ्यावी, असेही हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.


         स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ मध्ये ‘पीपीएल’ची स्थापना झाली. संस्थेकडे विविध भाषांतील २५ लाखांहून अधिक चित्रपट आणि अन्य  गाण्यांचे स्वामित्व हक्क आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करताना तसेच नववर्षांचे स्वागत करताना संस्थेची परवानगी घेणे आणि गाणी वाजवण्याचे परवाना शुल्क देणे गरजेचे आहे. 


        मात्र, असे असले तरी हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे स्वामित्व हक्क असलेली गाणी विनापरवाना वाजवण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच परवाना शुल्क देणे आणि संस्थेची परवानगी घेण्याबाबत आयोजकांना  दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संस्थेने हायकोर्टाकडे केली होती.

मागे

२० कोटी भारतीय मनोरुग्ण
२० कोटी भारतीय मनोरुग्ण

           नवी दिल्ली - देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक ....

अधिक वाचा

पुढे  

१७ लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही
१७ लाख सैनिकांना पदकांचं वाटपच नाही

              नवी दिल्ली - एका सैनिकाच्या छातीवर पदक म्हणजे त्याच्यासा....

Read more