ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील २३ अतिधोकादायक इमारती तात्काळ पाडण्याचे आदेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील २३ अतिधोकादायक इमारती तात्काळ पाडण्याचे आदेश

शहर : मुंबई

मुंबईतील २३ अतीधोकादायक इमारती तातडीने जमीनदोस्त करून त्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार आता महापालिकेने या २३ अतिधोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारती गिरगाव, वरळी, डोंगरी, परळ, वांद्रे, अंधेरी,गोरेगाव, मुलुंड आदि भागात आहेत. 


या संदर्भात अधिक माहिती अशी की, २०१४ मध्ये महापालिकेने सुमारे १२०० धोकादायक इमारतींची यादी न्यायालयात सादर केली होती. २०१७ साली भेंडी बाजारात इमारत पडल्यानंतर न्यायालयाने अतिधोकादायक इमारतींची यादी सादर करण्यास सांगितले. त्यानंतर २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी ४९९ इमारतींची यादी तयार करण्यात आली. या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले. या विरोधात २३ इमारतींच्या मालकांनी अपील केले होते. मात्र गेल्या महिन्यात डोंगरीत इमारत कोसळून दुर्घटना घडताच न्यायालयाने त्या अपीलावर तातडीने सुनावणी घेत, या सर्व इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अमलबजावणी केली जाईल, असे अशी ग्वाही महापौर महाडेश्वर यांनी दिली आहे. 


 

मागे

भारतीय अर्थव्यवथेची 7 व्या स्थानी घसरण 
भारतीय अर्थव्यवथेची 7 व्या स्थानी घसरण 

सन 2024 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स करण्याचे ध्येय पंतप्रधा....

अधिक वाचा

पुढे  

सांताक्रूझमध्ये विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा मृत्यू
सांताक्रूझमध्ये विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा मृत्यू

मुंबई - सांताक्रूझ (पूर्व) येथे सहयोग महाजीवन प्रगती मंडळ या जुन्या चाळीतील ....

Read more