ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 06, 2020 12:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

शहर : पुणे

राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाही,” अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतील,” अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.

जे 50 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवर सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे,” असेही उदय सामंतांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन आम्ही परीक्षा घेतो आहे. युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती, तर आम्ही मेमध्येही परीक्षा घेतली असती,” असेही ते म्हणाले.

ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न

तसेच अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले.

मागे

मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली, सायबर सेलचा अहवाल
मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली, सायबर सेलचा अहवाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर त्याचा जो तपास सुरु झाला त्यावेळी मु....

अधिक वाचा

पुढे  

अन्यथा, 11 ऑक्टोबरला एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ देणार नाही
अन्यथा, 11 ऑक्टोबरला एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ देणार नाही

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘एसईबीसी’चे आरक्षण व....

Read more