By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 08:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हिमाचल प्रदेशमध्ये आंबेनळी घाट दुर्घटनेसारखा प्रकार घडला आहे. एक खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना कुल्लू जिल्ह्यातील बंजार भागात घडली आहे.
या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे. तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.घटनास्थळी युद्धपातळीवर मदत कार्य सुरु आहे. या खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. ही खासगी बस बंजारहून गादागुशानीच्या दिशेने जात होती.मिळालेल्या माहितीनुसार ३५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या ३५ जणांमध्ये १८ महिला, १० पुरुष आणि ७ लहान मुलांना बाहेर काढण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष २०१८ - १९ साठी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न - ITR) फाईल करण्याची श....
अधिक वाचा